कळंब – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित नाशिक येथे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय पारंपारिक क्रीडा महाकुंभ व विविध स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.बुद्धिबळ या क्रीडा प्रकारामध्ये राज्यातून मुलींमधून कुमारी हर्षदा अशोक डोईफोडे हिने द्वितीय क्रमांक तर मुलांमधून कुमार सुदर्शन प्रल्हाद देवगिरे याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्याच संस्थेत कार्यरत असणारे शिल्प निदेशक भगवान जाधव यांनी बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे.संस्थेचे प्राचार्य संतोष कांबळे व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. धाराशिव च्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ खेळात बाजी मारल्यामुळे जिल्हा भरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.हर्षदा अशोक डोईफोडे ही वाशी तालुक्यातील पारा गावची असून मुलातून प्रथम क्रमांक मिळवलेला सुदर्शन प्रल्हाद देवगिरे हा सारोळा बु.जि. धाराशिव येथील रहिवाशी आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी