कळंब – सुशांत दयानंद भारती यांची FSO पदी निवड झाल्या बद्दल कळंब च्या नायब तहसीलदार किरण फुले यांनी सत्कार केला तसेच नूतन नायब तहसीलदार किरण फुले यांचा सत्कार गिरी मॅडम यांनी केला. याप्रसंगी नायब तहसीलदार किरण फुले व सुशांत भारती यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक हनुमंत पुरी,शारदा गिरी यांनी केला. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन अधीक्षक द्रोणाचार्य पुरी,बळीराम कवडे,गंभीरे,अच्युतराव मंडाळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बळीराम महाराज कवडे यांनी केले व आभार अच्युत मंडळे यांनी मानले.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड