June 19, 2025

मराठवाडा स्तरीय गायरान वहिती धारकांची जनसंसद बैठक संपन्न

  • कळंब – संविधानातील न्याय, स्वातंत्र्य,समानता,बंधूता या मुल्यांच्या आधारित गायरान वहितीधारकांच्या जनसंसदेचे दि.८ मार्च२०२५ रोजी जागतिक महिला हक्क दिनानिमित्त मराठवाडा स्तरीय बैठकीचे आयोजन श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे व सचिव माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कळंब पंचायत समिती येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पाराव मोरताटे गायरान जमीनीचे अभ्यासक (परभणी), हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे (बीड)हे होते. या वेळी विश्वनाथ गवारे जमीन अधिकार आंदोलन (परभणी), नागनाथ चव्हाण संस्थापक अध्यक्ष वंचित हक्क आंदोलन (लातूर), अशोक पालके संस्थापक अध्यक्ष युवा आंदोलन संघटना (आंबेजोगाई), रामभाऊ लगाडे जाणीव संघटना(वाशी), राम शेंडगे संस्थापक अध्यक्ष बहुजन अधिकार आंदोलन (धारूर), ज्येष्ठ साहित्यिक श्रावण क्षीरसागर (वाशी), हनुमंत भाऊ पाटुळे संस्थापक अध्यक्ष मानव अधिकार आंदोलन (कळंब), आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी (१७३)गायरान वहितीधारक कष्टकरी महिलांचा जागतिक महिला हक्क दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. मराठवाडा स्तरीय बैठकीमध्ये मराठवाड्यातील गायरान वहिती धारकांच्या जमिनी नावे करा, हवामान बदलाचा परिणाम, निवासी गायरान सरकारी जागेवरील अतिक्रमण प्लॉट नावे करून घरकुले बांधून देण्यात यावीत, आदी अनेक विषयावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन देण्याचे ठरले. मागण्या मान्य न झाल्यास मराठवाड्यातील प्रत्येक आमदार व खासदार यांच्या निवास स्थानासमोर गायरान वहीती धारकांची संसद भरूवुन सत्याग्रह आंदोलन करण्याचे बहुमताने ठरले. या बैठकीसाठी सुमन काळे,बापु खंडागळे,वामन कांबळे, उत्तम जाधव, मधुकर गालफाडे,दिनकर काळे,जुलेखा पठाण,ताजखाॅ पठाण, यांच्या सह बीड, लातूर,धाराशिव कळंब,भूम, परंडा,तुळजापूर,आदी ठिकाणांहून गायरान वहितीधारक व निवासी अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन भाई बजरंग ताटे यांनी केले. तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव सौ. माया शिंदे,अमर ताटे, मधुकर गालफाडे, सुनिल ताटे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!