कळंब – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत यावर्षी प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने तसेच गावातील ग्रामपंचायत,शालेय व्यवस्थापन समिती व विविध महिला बचत गट आणि आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका या सर्वांच्या सहकार्याने शाळेत गावातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री नारायण कराड,सहशिक्षक हनुमंत रामभाऊ घाडगे,मकरंद नाडे यांच्या प्रयत्नातून शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांच्या मार्गदर्शनात यावर्षी शाळेत प्रथमच महिला दिनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून याप्रसंगी गावातील महिलांच्या आरोग्याची तपासणी व आरोग्य विषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन गोविंदपुर बीटच्या शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती मैनाबाई मुळे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ येथील मेडिकल ऑफिसर डॉ.धनंजय चाळक व त्यांचे सहकारी समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती शितल दळवी,आरोग्य सेविका श्रीमती काळे,आरोग्य सेवक अशोक कुनघाडकर,वैज्ञानिक प्रयोग शाळा अधिकारी ऋषिकेश नान्नजकर,रविंद्र मैंदाड यांच्या सहकार्याने मौजे माळकरंजा येथील जवळपास 100 महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड,मधुमेह, रक्तदाब,किडणी,लिव्हर, चरबी,एच बी वन सी वन,कॅन्सर वगैरे चाचण्या करण्यात आल्या व महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे,आपले आरोग्य ठीक तर कुटुंब ठीक याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील नरसिंह सेंद्रिय महिला बचत गट अध्यक्षा श्रीमती उमा नेताजी कराड सी आर पी श्रीमती संगीता बालासाहेब बिक्कड,अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती शालिनीताई सोनावणे अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ती जयश्री कुलकर्णी आणि सुवर्णा जाधव,शालेय समितीचे अध्यक्ष शरद जी गालट उपसरपंच श्रीमती दिपाली गालट यांच्यासह अनेक नागरिक महिला भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थिती लावली.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी