कळंब – सेवन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच एन सी सी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल किशोर भागवत यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय शुभेच्छा भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पवार तसेच संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व लेफ्टनंट श्रीमती सरस्वती वायभासे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सीनियर अंडर ऑफिसर गौरी मुर्गे व ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रज्ञा मगर, यांनी पायलटिंग केले. तसेच सुहानी शिंदे व पूजा आवटे यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने सीओ सरांचं औक्षण केलं. कमांडिंग ऑफिसर कर्नल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना बी सर्टिफिकेट परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप येणार ती सोपी आहे का अवघड आहे तर ही परीक्षा सोपी नाही त्या परीक्षेचा साठी तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागेल याचे महत्त्व पटवून दिले. बऱ्याच गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. अशाप्रकारे आमच्या महाविद्यालयास त्यांनी वेळात वेळ काढून भेट दिली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात