August 10, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचा एकमेव संघ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ विभागीय कबड्डी स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर कबड्डी संघाने मुंबई विद्यापीठ संघाचा ४८ विरुद्ध २४ असा पराभव करीत दिनांक ७ नोव्हेंबर आपला विजय नोंदविला या संघात अक्षय सूर्यवंशी, जावेद पठाण,तेजस काळभोर,चढाई मध्ये तर पकडी मध्ये अल्केश चव्हाण,सुरेश जाधव, कृष्णा पवार,अभिषेक भोजने यांच्या आफलातून पकडी च्या जोरावर ही स्पर्धा जिंकुन महाराष्ट्रा मधून एकमेव विद्यापीठ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धे साठी संघ वेस्ट झोन मधून पात्र ठरला.
    या संघात खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन झाले. संघातील खेळाडू अक्षय सूर्यवंशी, जावेद पठाण ,सुरेश जाधव, अल्केश चव्हाण, तेजस काळभोर कृष्णा पवार, ऋषिकेश भोजने ,रोहित बिनीवाले ,भूषण तपकीर ,अर्यवर्धन नवाळे, संदेश देशमुख ,अभिजीत दागर या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत पश्चिम विभागातून १२८ संघ सहभागी आहेत यातून चार संघ पात्र ठरणार आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघच फक्त पात्र ठरला आहे.प्रशिक्षक डॉ.साजेद चाऊस , डॉ.माणिक राठोड संघ यवस्थापक डॉ भुजंग डावकर हे होते. या सर्वांचे फोन वरून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ व प्र. क्रीडा संचालक डॉ.संदीप जगताप यांनी अभिनंदन केले.
    इंदौर येथे स्पर्धा होत आहेत. संध्याकाळी लीग सामने सुरू होणार आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघ प्रशिक्षक प्रा. डॉ. साजेद चाऊस यांचे कळंब शहरातील क्रीडा प्रेमी नागरिकाकडून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!