धाराशिव (जिमाका) – केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन 2019 पासून करण्यात येत आहे.सन 2022 मध्ये फिट इंडिया क्विझ – 2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळाविषयी असलेले ज्ञान,कौशल्य आदींसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, भारतीय खेळांचा समृध्द इतिहास स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ व भारतीय खेळाडू आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.यामध्ये 3.25 कोटींच्या बक्षीसाचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले.याचप्रमाणे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक सामान्य ज्ञान चाचणीसाठी फिट इंडिया क्विझ 3 आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीमध्ये नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.तरी जिल्ह्यातील सर्व शाळा व विद्यार्थी यांनी http://fitindia.nta.ac.in/ या कार्यालयीन वेबसाईटवर नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात