June 24, 2026

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या –त्रिरत्न बौद्ध महासंघाची मागणी

  • धाराशिव – महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत दि.५ मार्च २०२४ रोजी त्रिरत्न बौद्ध महासंघाने
    राष्ट्रपतींना निवेदन दिले.
    याप्रसंगी त्रिरत्न बौद्ध महासंघ धाराशिवचे धम्मचारी आणि धम्म मित्र उपस्थित होते तसेच दुपारी ३:०० वाजता जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
    या प्रसंगी धम्माचारी रत्नपालित, धम्माचारी ज्ञानपालित,धम्माचारी प्रज्ञाजित,धम्माचारी धम्मभूषण, धम्माचारी जिनोदय,धम्माचारी जिनाघोष आणि धम्ममित्र अजिंक्य मुरुमकर,प्रीती मनोहर, तेजस्विनी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
error: Content is protected !!