कळंब – बिहार राज्यातील बुद्ध गया मंदिर कायदा – १९४९ रद्द करण्याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांच्यामार्फत दि.३ मार्च २०२५ वार सोमवार रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन पुढे म्हटले आहे की, बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहाराला सदरील कायद्यान्वये मंदिर असा उल्लेख करण्यात आला आहे.या कायद्या अंतर्गत व्यवस्थापन समिती ९ सदस्यांची असली तरी त्यात ५ सदस्य हिंदू आणि ४ बौद्ध असा नियम आहे. हिंदूच्या ५ सदस्या पैकी हिंदू असणारा जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे.परिणामी बाकी ४ बौद्ध सदस्याची गरजच नसल्याने हिंदू असणारा अध्यक्ष व ४ सदस्य मिळून सर्व निर्णय घेतात. महोदयांना विनंती की,बौद्धांचे धार्मिक स्थान असलेल्या बुद्धगया येथील बुद्ध गया मंदिर कायदा-१९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचा ताबा फक्त बौद्धांनाच द्यावा अशी विनंतीवजा मागणी केली आहे. या निवेदनावर प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके,सचिव प्रा.अविनाश घोडके,माजी नगरसेवक सुनील गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के,कैलास गायकवाड,सुयोग गायकवाड,अरुण कांबळे,प्रविण गायकवाड,विशाल शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड