June 22, 2025

ज्ञानाचा दीप उजळविणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विविध ठिकाणी अभिवादन

  • कळंब – “नाचू कीर्तनाचे रंगी” या संत नामदेवांच्या उक्तीप्रमाणेच, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा हाती घेतला.त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रसारच केला नाही, तर त्या शिक्षणाला समाजाच्या मुळाशी नेऊन रुजवले.
    शिक्षणाची मशाल गावागावांत निजामशाहीच्या कठीण काळात,जेव्हा शिक्षण मिळवणे हे स्वप्नासारखे होते,तेव्हा मोहेकर गुरुजींनी ग्रामीण भागात ज्ञानाची दारे खुली केली.शेतीप्रधान गावांमध्ये,शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शाळा उभारल्या. त्यांच्या मनात एकच ध्यास होता.”शिक्षण हेच सत्य,शिक्षण हेच समाजाचे खरे उद्धारक आहे.”
    संकटांवर मात करत उभारलेले शिक्षणमंदिर मोहेकर गुरुजींना समाजाच्या अडाणीपणाचे दु:ख होते.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कधी हार मानली नाही.त्यांनी स्वतःगावागावांत जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावले,त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रेरित केले.शेतकरी,कष्टकरी,गरीब घरातील मुलांसाठी शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच ठरली.
    संत विचारांचा वारसा संत नामदेव,संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षणाची वाटचाल ही भक्तीमार्गासारखी मानली.त्यांना वाटले की शिक्षण हेच समाजाच्या उन्नतीचे साधन आहे. “नाचू कीर्तनाचे रंगी” ही उक्ती त्यांनी प्रत्यक्ष कार्यात उतरवली.समाजासाठी अर्पणलेले जीवन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे कार्य म्हणजे एक दीपस्तंभ आहे.त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवली.त्यांची उभारलेली शाळा आजही अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवत आहे.गुरुजींच्या अथक परिश्रमामुळे,शिक्षणाची गंगा गावागावांत पोहोचली आणि हजारो जीवनांना नवसंजीवनी मिळाली.
    मराठवाड्यात गुरुजींनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विविध शाळा, महाविद्यालयात कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.२७ फेब्रुवारी २०२५ वार गुरुवार रोजी अभिवादन करण्यात आले.

  • विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्हि.जी,प्रशालेचे शिक्षक पवार डी.बी,विनोद सागर,काळे बंडू व नागटिळक संतोष हे उपस्थित होते.

  • ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव आण्णा मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,गुंगे,जनार्दन भामरे,अनुप पाटील,बालाजी काळे,ज्ञानोबा टोपे,अंगद आगलावे आदी जण उपस्थित होते.

  • विद्या मंदिर हायस्कूल आष्टा येथे कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.
error: Content is protected !!