धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रा.डाॅ.हरिदास फेरे,प्राचार्य,वसंतराव काळे महाविद्यालय,ढोकी प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रमास उपस्थित होते.विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले.विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डाॅ. विक्रम शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभी प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.डाॅ.विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले.जनतेच्या आशा,आकांक्षा पुर्ण करुन आदर्श राज्य निर्माण केले.इंग्रजी विभागातील विद्यार्थीनी
गायकवाड सानिका बाळासाहेब हिने शिवचरित्रावर आधारित कविता’मी सुद्धा लढणार’ सादर केली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
प्राचार्य डाॅ.हरिदास फेरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष
विशेष व्याख्यान दिले.त्यांनी म्हटले की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी
प्रजेचे कल्याण हे राजाचे मुलभूत कर्तव्य आहे,या भावनेतून राज्य कारभार केला.मध्ययुगीन काळात बहामनी सत्ता विभागलेली होती.निष्ठावंत मावळ्यांच्या मदतीने असंख्य रोमहर्षक लढाया जिंकल्या.
प्रत्येक माणसाला आनंदाने जगता आले पाहिजे.यासाठी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात उतरविले.
वैयक्तिक जीवनात अनेक दु:खे सोसून प्रजेच्या कल्याणासाठी राज्य निर्माण केले.प्रतिकूल परिस्थितीत माणसे निर्माण केली.अवघड मोहिमेत स्वतः सहभागी होत.
ज्या राज्यात लोक उभे आहेत, असे रयतेचे राज्य निर्माण केले. सामान्यांचे राज्य निर्माण केले. त्यांची उक्तीनुसार कृती होती. आग्रा भेटीसाठी गेले.या घटनेतून त्यांचे प्रामाणिकपणा,धाडस, सत्य निष्ठा,साहस आदि गुणांचे दर्शन होते.त्यांनी केेेलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी होत होती.सरदार तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा किल्ल्यावरील पराक्रम कथन केला.रायबाचे लग्न निश्चित झालेले असतांना,कोंढाणा किल्ल्यावरील कामगिरी जबाबदारी स्विकारली व प्राणपणाने पुर्ण केली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती समता,स्वातंत्र्य, न्याय व बंधुभाव या तत्वावर केली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आदर्श प्रमाण मानून राज्य घटना निर्माण केली.छत्रपती शिवाजी महाराज यांनी न्याय भावनेने राज्याचे नेतृत्व केले.
विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिवचरित्रातुन प्रेरणा घेऊन आपल्या व्यक्तिगत जीवनात गुण विकसित केल्यास आपल्यालाही यश प्राप्त होईल.आत्मविश्वास, धैर्य,प्रामाणिकपणा,सहिष्णुता, परोपकार,न्याय इ.गुणांचा विकास आपल्या व्यक्तिमत्त्वात केल्यास आपल्याला यश मिळेल. नैसर्गिक व मानवी संसाधनाचा कुशल उपयोग करुन प्रताप गडा सारख्या आव्हानात्मक लढाईत यश मिळविले.
कक्ष अधिकारी विद्याधर गुरव यांनी आभार मानले.कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरात विभागप्रमुख,प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक