कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून आणि भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष सदिच्छा भेट संपन्न झाली. याप्रसंगी धाराशिव जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी संस्थेला भेट देऊन शैक्षणिक व्यवस्थापन व उपक्रमांची पाहणी केली. संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास कळंब गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,अध्यापक विद्यालय विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश घोडके,तसेच निदेशक अविनाश म्हेत्रे,राजकुमार शिंदे,अर्जुन मंडाळे आणि विनोद कसबे यांची उपस्थिती होती. ही भेट संस्थेच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून,भविष्यात विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर