कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम कौतुकास्पद असून, पुरस्काराने काम करण्याची उर्मी वाढते व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले. या वेळी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा शिवभूषण पुरस्कार,जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भाटशिरपूरा येथील शिवभक्त गुलाब महेबुब शेख यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.पुरस्कारामध्ये शाल,श्रीफळ,सन्मानपत्र, ऊर्जा स्तंभ पुस्तक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार हेमंत ढोकले,ह.भ. प.महादेव महाराज,माजी नगरसेवक प्रताप मोरे,स्वप्ननगरी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल माने, कथले युवक आघाडीचे बाळासाहेब कथले,सुमित बलदोटा,यश सुराणा,शिवाजी गीडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तहसीलदार हेमंत ढोकले , बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकार संघ राबवत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून, या मागची भूमिका विषद केली.सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत यांनी केले,तर आभार सतीश टोणगे यांनी मानले. या वेळी शितलकुमार घोंगडे,परमेश्वर पालकर,श्याम जाधवर,दिलीप गंभीरे,राजे सावंत,बालाजी अडसूळ,प्रवीण तांबडे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड