कळंब – वैजनाथ बसी झोंबाडे यांची वाशी बहुजन जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. या नियुक्ती पत्रात बहुजन जनता पक्ष या राजकिय व वैचारिक चळवळीसाठी आपण वेळ,श्रम, बुद्धी,पैसा,कौशल्य हे पंचदान देऊन पक्षात सातत्याने कार्यरत आहात.आपण केलेल्या कार्याची दखल घेत,आपणास हे कार्य व्यापकरितीने करण्याची संधी मिळावी तसेच आपल्या माध्यमातून पक्ष अधिक अधिक बळकट व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून सदरिल नियुक्ती नियुक्तीपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्ष असेल.याप्रसंगी धनराज झोंबाडे, राजेंद्र कांबळे,दगडू झोंबाडे, भारत झोंबाडे यांची उपस्थिती होती
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात