August 9, 2025

तुळजापूर येथे युवा सेनेचा (शिंदे गट) विजयी दौरा संपन्न

  • धाराशिव – महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे,कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या महाराष्ट्र युवा विजय दौरा तुळजापूर येथे मराठवाड्याचे विभागीय सचिव निलेशजी शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण,मराठवाडा युवती सेना युवा सेना निरीक्षक अड. आकांक्षाताई चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत कमी वयामध्ये सामाजिक कार्य अतिशय जोमाने करत असल्यामुळे तुळजापूर येथील कार्यकर्ते किरण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवासेना संघटना बांधणी तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या युवा सेनेचा युवा विजयी दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे, युवासेना सरचिटणीस निखिल घोडके,युवासेना जिल्हा संघटक आकाश कांबळे,युवासेना शहर समन्वयक धनंजय शिंदे,विधानसभा अध्यक्ष खंडू कुंभार तसेच युवासेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!