February 9, 2026

जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी डॉ.वर्षा जाधव तर उपाध्यक्षपदी प्रा.अंजली मोहेकर

  • कळंब – जिजाऊ ब्रिगेड तालुका कळंब व शहराची कार्यकारणी दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.
    जिजाऊ व शिवरायांचे विचार व संस्कार रुजवावेत यासाठी गाव तिथे शाखा व महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रबोधन मिळावे असे मत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक बोराडे ताई (मेघा) यांनी व्यक्त केले.
    यावेळी जिल्हाध्यक्ष सौ.रेखाताई पवार यांनी जिजाऊ ब्रिगेडने तळागाळातील महिलांपर्यंत जावे व त्यांच्या प्रमुख समस्या सोडवाव्यात असे सांगितले.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब तालुका अध्यक्षपदी डॉ.वर्षा पंडित जाधव तर उपाध्यक्षपदी प्रा.अंजली अशोक मोहेकर तर सचिव पदी प्रा.मंगल सुधाकर ढेंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
    यावेळी धाराशिव जिल्हा प्रवक्ता म्हणून डॉ.मीनाक्षी श्रीधर भवर यांची सर्वांनुमते निवड झाली.तर कळंब शहराध्यक्षपदी सौ.प्रतिभा बाळकृष्ण भवर व उपाध्यक्षपदी सौ.संगीता संजय घुले यांची निवड करण्यात आली.
    या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांनी जिजाऊ व शिवरायांचा वारसा पुढे चालवण्याची ग्वाही दिली.नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वर्षा जाधव यांनी केले तर आभार प्रा.अंजली मोहेकर यांनी मानले.
error: Content is protected !!