कळंब – पत्रकारा बांधवांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या कळंब शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा व कर्तत्वान व्यक्तीचा सत्कार सोहळा दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंडे कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे आयोजित करण्यात आला आहे.या सत्कार सोहळ्या सोहळ्यास उपविभागीय अधिकारी संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर,कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट इंग्लिश स्कूलचे संचालक रवी नरहिरे,व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय चोरडिया आदी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार गणेश शिंदे,माधवसिंग राजपूत, सुभाष घोडके,दिलीप झोरी, तुळशीराम चंदनशिवे,प्रा.डॉ.साजेद चौऊस,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,डॉ.अजित देशमुख, डॉ.करिष्मा शेख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी संघटनेच्या सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमर चोंदे यांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड