कळंब – कळंब शहरात शिवजयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो.यामध्ये सर्व समाज घटकाचा सहभाग असतो.ही परंपरा कायम टिकवण्यासाठी शांतता व सुव्यवस्था राहावी.यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व कायद्याची उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी मिरवणुकीत डॉल्बी ऐवजी परंपरागत वाद्याचा वापर करावा व ध्वनी प्रदूषण टाळावे असे विचार संजय पाटील उपविभागीय अधिकारी कळंब यांनी कळंब पंचायत समिती सभागृह येथे ६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त आयोजित शांतता समिती सदस्य, शिवजयंती महोत्सव समिती पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या बैठकीत बोलत असताना व्यक्त केले.याप्रसंगी मंचावर. पोलीस निरीक्षक रवी सानप, तहसीलदार हेमंत ढोकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर,कळंब बस आगार वाहतुक निरिक्षक निलेश जाधव,नगर परिषद कार्यालयीन अधिकारी एल.एस.वाघमारे ,ज्येष्ठ विधीज्ञ त्रिंबकराव मनगिरे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आपल्या भाषणात शांततेला बाधा येईल असे कृत्य कोणी करीत असेल तर त्याविषयी प्रशासनाला माहिती द्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले तर पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी मिरवणुकीत सहभागी होण्याचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी नियमाचे पालन व्हावे असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित विधीज्ञ त्रिंबकराव मनगिरे,प्रकाश भडंगे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा प्रदेश संघटक अतुल गायकवाड,युवा वक्ते प्रतीक गायकवाड,ऍड,शकुंतला फाटक पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी शिवजयंती महोत्सवात समाज प्रबोधनपर ,कार्यक्रम रक्तदान शिबिर,व्याख्यान कार्यक्रम आदी आयोजना विषयी तसेच शहरातील स्वच्छता,वाहतूक व विद्युतव्यवस्थेविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे यांनी केले बैठकीस शांतता समिती सदस्य,शिवजयंती महोत्सव मंडळ सदस्य व पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे