February 9, 2026

कर्करोग प्रतिबंधात्मक उपचार हाच उपाय – डॉ.शितल कुंकुलोळ

  • कळंब – इनरव्हील क्लब कळंब,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब. इंडियन मेडिकल असोसिएशन, बाल आरोग्य परिषद,स्त्रीआरोग्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण जनजागृती अभियान दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी मोहेकर महाविद्यालयात घेण्यात आले . याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. शितल कुंकुलोळ यांनी गर्भाशय पिशवीचा कर्करोग हा एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा विषाणू ) संक्रमणामुळे होतो.यासाठी मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी जर ही लस दिली तर जवळजवळ ९७% पर्यंत कॅन्सर पासून संरक्षण मिळते, लसीकरणाची योग्य वेळ ९ते १४ असून,१२ वर्षे वयापर्यंत जर लस दिली तर खूप चांगले परिणाम दिसून येतात.बाल आरोग्य परिषद व स्त्री आरोग्य परिषद यांच्या माध्यमातून ही लस शालेय स्तरावर मोफत देण्यात यावी आणि त्याचा आपण शासनाकडे पाठपुरावा करू असे प्रतिपादन आयएमएचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अंजली मोहेकर तुमच्या मुलीला लस द्या आणि कॅन्सरपासून सुरक्षीत रहा,महिलांचा जीव मोलाचा सर्वांनी ही लस घ्या असे आवाहन केले.प्रमुख उपस्थिती मध्ये रोटरी क्लब अध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते,या लसीकरण व जनजागृती अभियानाच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लब कळंबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा भवर सचिव डॉ. प्रियांका अडमुठे,प्रोजेक्ट चेअरमन डॉ. वर्षा कस्तुरकर,प्रा.अर्चना मुखेडकर व संयोजक डॉ. पल्लवी उंदरे,डॉ.मीनाक्षी जाधव, डॉ.वर्षा सरवदे,सौ.राजश्री देशमुख,डॉ.मीनाक्षी भवर यांनी नियोजन केले.या कार्यक्रमासाठी नगरपरिषद कन्या प्रशाला कळंब,शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यानिकेतन कळंब, जिल्हा परिषद प्रशाला उर्दू कळंब,जिजामाता प्राथमिक शाळा कळंब,आणि महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट मुली,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,इनरव्हील क्लब कळंब चे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी उंदरे,प्रास्ताविक प्रा.अर्चना मुखेडकर आणि आभार डॉ.वर्षा सरवदे यांनी केले.
error: Content is protected !!