कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि चेअरमन हनुमंत मडके यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली असलेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट संस्थेने आपल्या अभिनव कार्यशैली,दृढ विश्वास आणि सदस्यनिष्ठेच्या बळावर प्रतिष्ठित “बँको ब्लु रिबन २०२४” हा पुरस्कार पटकाविला आहे. यामुळे दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांचा प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कळंब शहरातील भगवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रा.अविनाश घोडके यांनी चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांचा पुष्पहार,मिठाई,साक्षी पावनज्योतचा कै.सुमन आई मोहेकर प्रथम पुण्यस्मरण विशेषांक आणि ‘विरंगुळा’ – पथनाट्य व अग्रलेख संग्रह पुस्तक देऊन सन्मान केला. या सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट संस्थेच्या उल्लेखनीय कार्यशैलीचे आणि समाजहितातील योगदानाचे कौतुक केले.संस्थेने सहकार क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करत असलेल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात