धाराशिव – शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन १ लाख ९४२ रुपयांचे ४५ सोयाबीन कट्टे मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून,चोरीच्या मालासह शिराढोण आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.इतर आरोपींचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील मुद्देमालविषयक गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब उपविभागात गस्तीवर असताना २४ जानेवारी रोजी ही कारवाई केली. पिंपळगाव डोळा पारधीपिड़ी येथील व शिराढोण ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी बबलू फुलचंद पवार याने त्याच्या साथीदारांसह मंगरूळ शिवारातील सोयाबीन चोरल्याची खात्रीशीर माहिती होती. त्याप्रमाणे पथकाने कारवाई केली असता आरोपी मिळून आला.पथकाने त्यास ताब्यात घेऊन अनुषंगाने गुन्ह्याच्या विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेतल्यानंतर आरोपीने इतर साथीदारांसह मिळून चोरी केल्याची कबुली दिली.पथकाने आरोपी बबलू फुलचंद पवार व दादा फुलचंद पवार यांच्यासह २४.६२ क्विंटल सोयाबीनचे ४५ पोते मुद्देमाल शिराढोण पोलिसांच्या ताब्यात दिले.ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलिस हवलदार शौकत पठाण,फहरान पठाण, चालक डोंगरे,भोसले यांच्या पथकाने केली आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी