June 20, 2025

जि.प.कन्या शाळा मोहा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • मोहा – जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मोहा येथे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात पालक सदस्य ग्रामस्थ यांचे स्वागत करून झाली.विद्यार्थ्यांचे डंबेल्स कवायत व झेंडा कवायत घेण्यात आली.शाळेमध्ये २० जानेवारी ते २५ जानेवारी या सप्ताहामध्ये क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला होता. यामध्ये वैयक्तिक व सांघिक विविध स्पर्धा घेऊन खेळांमध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय,क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रजासत्ताक दिनी पाहुण्यांच्या हस्ते पॅड,रजिस्टर,पेन,पेन्सिल बॉक्स व सोबत प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचा सन्मान केला.प्रत्येक वर्गाचे देशभक्तीपर,विविध गीत डान्स घेण्यात आले.ग्रामस्थ, पालकांनी गीत डान्स पाहून बक्षिसे दिली.
    शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,यशवंत नारायण वीर यांनी शाळेची सर्व दुरुस्ती करून दिली.यामध्ये वर्गासमोरील व्हरांड्यात फरशी बसून देण्यात आली.ध्वजकट्टा नवीन करून दिला.रॅम्प दुरुस्त करून दिला.शाळेसाठी पायऱ्यांची दुरुस्ती करून दिली.यामुळेच विद्यार्थ्यांची सोय झाली.तसेच सर्व विद्यार्थ्यांना १५० बक्षीस वाटप साहित्य आणून दिले.दिले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
    शिक्षणप्रेमी श्रीकांत नारायण वीर यांनी दोन खोल्याची बाहेरून रंगरंगोटी व लिखाण काम करून दिले.यामुळे शाळेची शोभा वाढली.शाळा आकर्षक झाली तसेच शाळेचे रूपच पालटले.या योगदानासाठी श्रीकांत व यशवंत वीर या बंधूंचा जिल्हा परिषद कन्या शाळा मोहा यांच्या वतीने केंद्रप्रमुख डिकले व मुख्याध्यापक पवार यांच्याहस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी पालक व मातापालक यांची लक्षणीय उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती आगळे,क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती नागटिळक,शालेय कार्यक्रमाचे नियोजन वाघमारे, व्होके व आभार मुख्याध्यापक पवार यांनी मानले.
error: Content is protected !!