August 9, 2025

प्राचार्य डॉ.साजिद चाऊस यांचा सत्कार

  • कळंब – तालुक्यातील शिराढोण येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.साजेद चाऊस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मंडळ नियोजन समितीवर निवड झाली.विद्यापीठाच्या सर्व स्पर्धेच्या नियोजन करणे, मार्गदर्शक,व्यवस्थापक यांची नियुक्ती करणे या महत्त्वाच्या पदावर निवड झाली.याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने ह.भ.प महादेव महाराज आडसुळ,उद्योजक विठ्ठल माने,उपक्रमशील शिक्षक शिवव्याख्याते महादेव खराटे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव,स्व.गणपतराव कथले युवक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले,ॲड.मुर्गे, मुख्याध्यापक मुकुंद नांगरे,आदर्श शिक्षक गजानन पाटील,रमेश शिंदे यांच्या शुभ हस्ते प्राचार्य डॉ. साजिद चाउस यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प महादेव महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी प्राचार्य साजिद चाऊस यांच्या क्रीडा विषयक केलेल्या कार्याचा गुणगौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य साजिद चाऊस यांनी माझं उर्वरित आयुष्य हे कळंब व परिसरातील मुलांच्या क्रीडाविषयक विकासासाठी समर्पित करणार आहे असे जाहीर केले आहे.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल माने व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खराटे व आभार प्रदर्शन अनिल यादव यांनी केले.
error: Content is protected !!