धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 191 कारवाया करुन 1,60,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.27.01.2025 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 390 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 27 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 112 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 29,220 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात आरोपी नामे-राणी शंकर काळे, वय 35 वर्षे, रा.अंदोरा ता. कळंब जि.धाराशिव या 12.30 वा. सु. आंदोरा पारधी वस्ती आंदोरा येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4,900 ₹ किंमतीचे 140 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-बाळु बन्सी काळे, वय 56 वर्षे, रा.बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव हे 17.33 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 740 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
2)भुम पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात आरोपी नामे-सुभाष साहेबा काळे, वय 44 वर्षे, रा.बह्राणपुर ता. भुम जि.धाराशिव हे 13.30 वा. सु. उळुप फाटा ते बह्राणपुर गावात जाणारे रोडलगत एका घरासमोर अंदाजे 9,000 ₹ किंमतीचे 150 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सुरेश मच्छिंद्र पवार, वय 35 वर्षे, रा.आरसोली ता. भुम जि. धाराशिव हे 15.00 वा. सु. आरसोली ते वंजारवाडी गावात जाणारे रोडलगत एका घरासमोर अंदाजे 6,000 ₹ किंमतीचे 100 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आली.
3)धाराशिव ग्रामीण पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.यात आरोपी नामे-बालाजी अंगद कांबळे,वय 46 वर्षे,रा.उत्तमी कायापूर ता.जि.धाराशिव हे 13.20 वा. सु.उत्तमी कायापूर येथे आपले शेतातील पत्राचे शेडसमोर अंदाजे 1,080 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारच्या 36 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सुरज संभाजी म्हैत्रे, वय 41 वर्षे, रा. पाटोदा ता. पाटोदा जि बीड, ह.मु. बावी ता.जि.धाराशिव हे 14.40 वा. सु. बावी शिवारात एनएच 52 रोडलगत असलेल्या हॉटेल रानवारा येथे अंदाजे 2,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 36 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आली.
4)वाशी पो. ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात आरोपी नामे-ताई शिवाजी पवार, वय 30 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि.धाराशिव हे 16.00 वा. सु.पारगाव येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,300 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे-श्रीकांत चंद्रकांत लगाडे, वय 18 वर्षे, रा. सारोळा रोड, ता. वाशी जि.धाराशिव हे 17.00 वा. सु.पारा चौक वाशी येथे अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सिमाबाई सुरेश शिंदे, वय 38 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि.धाराशिव हे 14.30 वा. सु.मांडवा येथे अंदाजे 1,300 ₹ किंमतीची 12 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
5)धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-प्रकाश साहेबराव वाठोरे, वय 24,रा. तामसा ता. हादगाव जि. नांदेड ह.मु. बार्शी नाका धाराशिव, रावसाहेब गोपीनाथ वाघमारे, वय 63 वर्षे, रा.अजिंठा नगर, सरकारी दवाखाना शेजारी धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.30वा. सु. हॉटेल देवराज खानावळ छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे शेजारी इंदीरानगर धाराशिव येथे अंदाजे 740 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
6)तुळजापूर पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे- अनिल सुनिल पवार, वय 25 वर्षे, रा.सांगवी मार्डी, ता.तुळजापूर जि.धाराशिव हे 18.00 वा. सु.सांगवीमार्डी गावातुन काटी रोडकडे जाताना सर्व्हीस रोडचे बाजूस पानटपरी लगत सांगवी मार्डी येथे अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तामलवाडी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.27.01.2025 रोजी 17.30 वा. सु.तामलवाडी पो ठाणे हद्दीत माळंब्रा गाव ते कदमवाडी जाणारे रोडचे बाजूस तुळजापूर ते सोलापूर जाणारे रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बाजीराव शहाजी वडणे, वय 45 वर्षे, प्रविण दादाराव गायकवाड, वय 40 वर्षे, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव, सतिश हरिदास साळुंखे, वय 33 वर्षे, रा. पांगरधरवाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव हे 17.30 वा.सु माळंब्रा गाव ते कदमवाडी जाणारे रोडचे बाजूस तुळजापूर ते सेालापूर जाणारे रोडलगत तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 710 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.27.01.2025 रोजी 16.20 वा. सु.बेंबळी पो ठाणे हद्दीत पाटोदा येथे स्टॅण्ड जवळ वडाचे झाडाखाली रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-ज्ञानदेव रामा ढोले, वय 60 वर्षे, रा. पाटोदा ता. जि.धाराशिव हे 16.20 वा.सु पाटोदा येथे स्टॅण्ड जवळ वडाचे झाडाखाली रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,240 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.” येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अभिजीत बबन टेकाळे, वय 29 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.27.01.2025 रोजी 22.10 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एए1526 ही मलकापुर पाटी जवळ एनएच 52 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“सार्वजनिक ठिकाणी हानामारी करुण शांतता भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- अविनाश शिंदे, कल्याण शिंदे, आदिनाथ खांडेकर, पिंटु शिंदे, नितीन शहाजी राठोड, आकाश डोलारे, संदीप राठोड, योगेश कल्याण शिंदे, प्रसाद खांडके, सचिन राठोड, अक्षय राठोड, विशाल राठोड, ओम चव्हाण, महेश राठोड अजीत राठोड, रोहण जाधव व इतर इसम यांनी दि. 26.01.2025 रोजी 22.30 वा. सु. घाटंग्री येथील आश्रम शाळा चौकात सार्वजनिक ठिकाणी आपापसात हानामाऱ्या करुन सार्वजनिक शांतता भंग करत असतांना धाराशिव ग्रामीण पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 194(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रफीक मुस्तफा फकीर(मिठाईवाले), वय 61 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव यांचे व त्यांचे शेजारील लोकांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींनी दि. 26.01.2025 रोजी 04.00 ते 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिन व रोख रक्कम 1,90,000₹ असा एकुण6,80,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रफिक फकीर (मिठाईवाले) यांनी दि.27.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नागेश शेषेराव हाजगुडे, वय 36 वर्षे, रा. रामवाडी, ता. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल क्र एमएच 24 एएम 8989 ही दि. 25.01.2025 रोजी 23.00 ते दि. 26.01.2025 रोजी 07.30 वा. सु. नागेश हाजगुडे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागेश हाजगुडे यांनी दि.27.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-महादेव गोवर्धन चौधरी, दत्तात्रय गोवर्धन चौधरी, लक्ष्मी दत्तात्रय चौधरी, रुपाली महादेव चौधरी, कुसुम गोवर्धन चौधरी, गोवर्धन मारुती चौधरी सर्व रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.01.2025 रोजी 18.30ते 20.00 वा. सु.वडणेर येथे फिर्यादी नामे-त्रिशाला हणुमंत चौधरी, वय 55 वर्षे, रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव यांना व त्यांचे पती हणुमंत चौधरी व मुलगा सुरेश चौधरी यांना नमुद आरोपींनी शेतात येण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- त्रिशाला चौधरी यांनी दि.27.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352,351(2), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-आकाश भारत शेळके, वय 27 वर्षे, रा. झोपडपट्टी, बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.26.01.2025 रोजी 22.30 वा. सु.मातोश्री हॉटेल उजनी रोड बेंबळी येथे फिर्यादी नामे-शाहरुख अन्वर कोतवाल, वय 27 वर्षे, रा. बेंबळी ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाहरुख कोतवाल यांनी दि.27.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115 (2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“नुकसान करणे.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-डिगांबर बापुराव रसाळ, रा. शेंडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.20.01.2025 रोजी 20.30ते 21.30 वा. सु.शेतगट नं 208 मधील शेंडी शिवारातील फिर्यादी नामे-आश्रुबा सौदागर गुंजाळ, वय 65 वर्षे, रा. शेंडी ता.वाशी जि. धाराशिव यांचे काढून ठेवलेले तुरीचा ढिगारा अंदाजे 20 कट्टे 70,000₹ किंमतीचा जाळुन नुकसान केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आश्रुबा गुंजाळ यांनी दि.27.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 326(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
बेंबळी पोलीस ठाणे: मयत नामे-शंकर चंद्राप्पा मस्के, वय 35 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव हे दि.09.12.2024 रोजी 23.00 वा. सु. ताकविकी शिवारात लातुर ते तुळजापूर जाणारे हायवेला हॉटेल खंडेराया जवळ बागल यांचे हॉटेल बंद करुन तोरंबा येथे जाण्यासाठी पायी जात होते. दरम्यान स्विफट कार क्र एमएच 11 बीडी 9797 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शंकर मस्के यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शंकर मस्के हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर नमुद कार चालक हा जखमीस उपचार कामी न नेता वाहनासह पसार झाला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-द्रोपदी शंकर मस्के, वय 40 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव यांनी दि.27.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे: मयत नामे-तात्या विरभद्र पाटने, रा. पारेवाडी ता करमाळा जि. सोलापूर हे व जखमी नामे- आनंद हणुमंत घोडके, प्रतिक्षा विठ्ठल पाटील, साक्षी मारुती सोनवणे, नम्रता नागनाथ शिंदे, सर्व रा. कंडारी, ता. परंडा जि. धाराशिव व इतर प्रवासी हे दि.27.01.2025 रोजी 07.30 वा. सु.रोहकल ते परंडा जाणारी बस क्र एमएच 20 बीएल 2105 मधून जात होते. दरम्यान सोनारी ते परंडा जाणारे रोडवर हरणवडा येथे बस चा चालक आरोपी नामे-विठ्ठल दत्तु तौर, रा. अरणगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील बस ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून निलगीरीच्या झाडाला धडक दिली. या अपघातात बसमधील प्रवाशी तात्या पाटने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आनंद हणुमंत घोडके, प्रतिक्षा विठ्ठल पाटील, साक्षी मारुती सोनवणे, नम्रता नागनाथ शिंदे, व इतर गंभीर व किरकोळ जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आप्पसाहेब शेषनाथ गवळी, वय 35 वर्षे, रा. कंडारी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.27.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),(ब), 106(1) 324(4), सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी