कळंब – महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मंडळाकडून वर्षातून सहा महिन्यासाठी मोफत प्रवास सुविधा पास देण्यात येत परंतु ही सुविधा अखंड स्वरूपात असावी व प्रत्येक वर्षी या पासचे नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी रा.प.सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री,परिवहन मंत्री व मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्याचे नूतन परिवहन मंत्री म्हणून नामदार प्रताप सरनाईक यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्य परिवहन मंडळ सेवानी वृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्या आयोजित आता नऊ महिने मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केले आहे.या निर्णयाचे धाराशिव जिल्हा रा.प.सेवानीवृत्त कर्मचारी असोसिएशन यांच्यावतीने स्वागत करण्यात येत असून ही मोफत प्रवास सुविधा नऊ महिने ऐवजी पूर्ण वर्षासाठी करण्यात यावी.याचबरोबर ही प्रवास सवलत फक्त लाल रंगाच्या गाडीसाठी पूर्ण असून बाकी शिवशाही तसेच हिरकणी बससाठी असलेला जास्तीचा तिकीट दर द्यावा लागणार आहे. हा निर्णय बदलून सर्व गाड्यांसाठी शंभर टक्के मोफत पास सेवा करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनावर धाराशिव जिल्हा रा.प.सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अच्युतराव माने,अध्यक्ष राजाभाऊ आंधळे,सचिव वासुदेव वेदपाठक,अंकुशराव पाटील,शाहू कावरे,हरिभाऊ भोसले,नबी शेख (धाराशिव) मधुकर बिद्री,दादाराव संगमे (उमरगा )प्रशांत कोंडो,चंदू देशमाने(तुळजापूर),जब्बार जीनेरी,शशी जाधव (परांडा), रामभाऊ कवडे,बी.के.झाल्टे ( कळंब )यांच्या सह्या आहेत.
More Stories
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक