August 9, 2025

कंडारी येथील मराठा आरक्षण उपोषणकर्ते बालाजी देशमुख यांची तब्येत बिघडली

  • कंडारी – परंडा तालुक्यातील कंडारी येथे मराठी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ कंडारी येथे दि. २६ ऑक्टोबर २०२३ पासून साखळी उपोषण सुरू होते.मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार दिनांक 29 पासून कंडारी येथील साखळी उपोषणाचे अमरण उपोषणात रूपांतर झाले आहे.येथील ७ मराठा बांधवांनी अमरण उपोषण सुरू केले आहे .यातील उपोषणकर्ते बालाजी हनुमंत देशमुख यांची तब्येत बिघडली असून काल दिनांक ३१ रोजी दुपारी अनाळा येथील अरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती अमिता लाखे हे वैद्यकीय पथक घेऊन हजर होत्या.तपासणी केली असता अंदोलनकर्ते बालाजी देशमुख यांचे शुगर लेवल कमी झाल्याचे सांगितले.दरम्यान डॉक्टरांना औषधोपचार घेणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.उपोषणकर्ते ऐकत नसल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी वरीष्ठांशी याची संपर्क साधून घटनेची माहिती दिली .
    दरम्यान नायब तहसीलदार श्रीमती उत्कर्षा जाधव या उपोषण स्थळी येऊन उपोषण मागे घेऊन औषधोपचार घेण्याची विनंती केली.परंतु मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटल्या शिवाय मी औषधोपचार घेणार नाही असे उपोषणकर्ते देशमुख यांनी सांगितले.यावेळी मंडळ अधिकारी श्री शेख , तलाठी अकाश वानखेडे , अंबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे,बीट अंमलदार बाळासाहेब होडशीळ यांचे सह मोठ्या पोलीस फौजफाटया सह उपस्थीत होते.
  • * काल परंडा तालुक्यातील सर्व गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.कंडारी येथे ही दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवून १००% सहभाग नोंदवला .
  • * मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिवचरित्रकार ह.भ.प बालाजी महाराज बोराडे यांनी कंडारी येथे उपोषण स्थळी किर्तन करून अंदोलनात सहभाग घेतला .
  • *उपोषण करणाऱ्या पैकी जनार्धन देशमुख व समाधान तिंबोळे यांचा बिपी वाढला आहे. घाबरण्याच कारण नाही . परंतु बालाजी देशमुख यांची शुगर लेवल 70 पर्यंत कमी झाली आहे. आणखी कमी झाल्यास धोकादायक असल्याचे डॉ. श्रीमती अमिता लाखे यांनी सांगितले.
error: Content is protected !!