धाराशिव (जिमाका) – धाराशिव शहर स्थानिक येथे हजरत ख्वाजा शम्सोद्दीन गाझी ऊर्स-२०२५ निमित्त १६ जानेवारी २०२५ रोजी मुख्य संदल मिरवणूक निघणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) चा वापर करून ही मिरवणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १६ जानेवारी रोजी धाराशिव शहर स्थानिक येथील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मदविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ व त्या अंतर्गत असलेल्या नियमातील तरतूदीनुसार संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला