कळंब- तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरवुन गावकरी आणि विद्यार्थी यांना एक वेगळा आनंद निर्माण करून दिला. याबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी सांगितले की, आमची शाळा ही वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावात बाजार भरवला आणि येथे येणाऱ्या मकर संक्रांतीला आवश्यक असणार्या विविध प्रकारच्या वस्तू आणि स्थानिक पातळीवर उत्पादित भाजीपाल्याची विविध दूकाने थाटली.पुढील आठवड्यात शाळेची सहल कोकण दर्शन करण्यासाठी जात आहे.त्यासाठी स्वकमाई म्हणून आज मोठ्या संख्येने आणि प्रचंड उत्साहात विद्यार्थी सहभागी झाले आहेत.मूलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे,वस्तुंची देवाणघेवाण करता यावी,आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.शाळेतील सहशिक्षक हनुमंत घाडगे,मकरंद नाडे,श्रीमती भारती सुर्यवंशी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कु.मंजुश्री कराड यांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन कळंब गटशिक्षण कार्यालयातील शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती मैनाबाई मुळे,गावचे सरपंच विजय शिंदे, उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद गालट यांच्या सह गावातील ग्रामस्थांनी रिबीन कापून उद्घाटन केले.यावेळी पालक, विद्यार्थी,महिला यांनी या बाजारात मनसोक्तपणे खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन