September 24, 2026

ज्ञान प्रसार प्राथमिक मध्ये राष्ट्रमाता जिजाबाई यांची जयंती उत्साहात साजरी

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे राष्ट्रमाता जिजामाता यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच भावी पिढीने राष्ट्रमाता जिजाऊ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिढी घडवली पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील कु.सानिका बाराखोते हीने केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पांचाळ उषा यांनी केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षिका श्रीमती सोनवणे नीता,श्रीमती स्मिता पाटील,टोपे ज्ञानोबा,प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!