कळंब – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोडके यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त दि.९ जानेवारी २०२५ वार गुरुवारी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील पालांवरील नागरिकांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव अडसूळ महाराज,संतयोगी साधूबुवा महाराज मंदिर संस्थान पिंपळगाव (डो) अध्यक्ष ह.भ.प नारायण दशवंत महाराज,पद्मश्री शंकर बापू विद्यालय,हासेगाव (के) मुख्याध्यापक परमेश्वर पालकर,संभाजी विद्यालय,जवळा (खु) मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,कै. भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,दै.लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ,समाजसेवक सुफी शमशोद्दीन,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,राजेंद्र बारगुले,महेश फाटक,प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
सुभाष घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अभिष्टचिंतन
प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष घोडके यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त कळंब पोलिस स्टेशनमध्ये उपअधीक्षक संजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक रवी सानप,शिराढोण प्रभारी अधिकारी कल्याण नेहकर व ढोकी पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हजारे आदींची उपस्थिती होती.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने कुशल व्यावसायिक दिलीप टोणगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे यांची उपस्थिती होती.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालक आश्रम येथे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव अडसूळ महाराजांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा व पुष्पहाराने यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ह.भ.प सुनिता महाराज अडसूळ,समाजसेवक सुफी सय्यद शमशोद्दीन,नारायण दशवंत,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत, विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,शहर प्रतिनिधी महेश फाटक आदींची उपस्थिती होती.
पोलिस मित्र असोशियन मित्र संघटनेच्या वतीने सचिव संत सुफी शमशोद्दीन सय्यद यांनी सुभाष घोडके यांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप लिमिटेड मोहाच्या कळंब शहर शाखेतील व्यवस्थापक फुलचंद (अण्णा) मडके यांच्या हस्ते हस्ते सुभाष घोडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीकांत मडके,राहूल मडके,प्रा.अविनाश घोडके,तुषार साठे आदींची उपस्थिती होती.
श्रीराम ऑफसेट प्रिंटर्सच्या वतीने संपादक सुभाष घोडके यांचा आरोग्य लक्ष्मीकांत साखरे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रोप्रयटर तथा सा.साक्षी पावनज्योत निवासी संपादक रामेश्वर खापे,विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,नारायण दशवंत आदींची उपस्थिती होती.
दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ यांनी संपादक सुभाष घोडके यांना पुस्तक देवून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी दै.पुढारी प्रतिनिधी परमेश्वर पालकर,दै.संघर्ष प्रतिनिधी संभाजी गिड्डे,एबीपी माझा वाहिनीचे प्रतिनिधी आप्पा शेळके आदींची उपस्थिती होती.
जनजागृती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक पाराप्पा सोनवणे यांनी अध्यक्ष सुभाष घोडके यांचा पुष्पगुच्छ देवून अभिष्टचिंतन केले.
ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष बंडू आबा ताटे यांच्या वतीने सुभाष घोडके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश भंडगे,खादी ग्रामोद्योग संघाचे व्हाईस चेअरमन सुनिल लिके,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर