करंजकल्ला – वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत दि.१ जानेवारी २०२४ रोजी कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथे डॉ.राममनोहर लोहिया वाचनालयाच्या वतीने गावातील नागरिक, वाचक,शालेय विद्यार्थी,शिक्षक यांच्या उपस्थितीत ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. या वेळी वाचक ज्ञानोबा गोविंद पवार यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.या प्रदर्शनात ऐतिहासिक,थोर पुरुष यांची चरित्र,विज्ञानविषयक, बालसाहित्य,आध्यत्मिक,आरोग्यविषयक,शेतीविषयक,महिलांसाठीचे साहित्य कथा,कादंबऱ्या यासह विविध विषयांवरील मासिके,साप्ताहिके, मासिके यांचीही मांडणी करण्यात आली.
यावेळी शालेय विध्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करा …वाचा असा संदेश नववर्षानिमित देण्यात आला.मुलांना वाचनालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शन नवीन वर्षाच्या निमित्ताने एक नवी सुरवात करून गेल…..या वेळी शालेय मुलांना वाचनालय मार्फत विनामूल्य ग्रंथ वाचक सभासद करून घेण्यात येईल असे कार्यक्रमाच्या वेळी सांगण्यात आले.या वेळी राजकुमार पवार, वाचनालयाचे कार्यवाह संतोष पवार,ग्रंथपाल नीलावती पवार,आशा पवार,कैलास पवार, कुकर्णी सर,ढेपे सर,चव्हाण सर,सौ.रानभरे ,सौ.कुलकर्णी मॅडम यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड