August 10, 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवल्या टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी (ब) विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतर्गत टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे या उपक्रमांतर्गत मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाचे भेटकार्ड तयार केले आहे.या भेटकार्डावर पर्यावरण जनजागृती,लोकसंख्या,आपत्ती व्यवस्थापन,मतदान जनजागृती, अशा प्रकारचे संदेश देण्यात आले आहेत.
    सदरील उपक्रमाचे रणसम्राट क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मनोरमा ताई शेळके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे,उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक केले व मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!