कळंब – जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनातुन कळंब येथील संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायातील फिफ्थ व्हील पार्किंग वेहिक्ल या प्रोजेक्ट ची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कौशल्यात भर पडून त्यांच्यात संशोधनात्मक वृती जागी होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी दरवर्षी आशाप्रकारच्या तंत्रप्रदर्षणाचे आयोजन करण्यात येते.नंतर येथून त्यांची विभागीय करिता निवड करण्यात येते.धाराशिव येथील भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.24/12/2024 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी विविध प्रकारचे प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते.सदर प्रदर्शनासाठी प्रत्येक औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून तीन प्रोजेक्ट ची निवड जिल्हास्तरावर कऱण्यात आली होती. या मघ्ये शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थीनी फिफ्थ व्हील पार्किंग वेहिक्ल या प्रोजेक्टची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्षणात आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक खासगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था मधून एकूण 42 प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते. त्यापैकी संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायाच्या करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे आणि शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य अंधारे, स्वंचल विभागाचे प्रमुख एल एम माने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य,शिल्पनिदेशक,आणि प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते.या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य केशव पवार,गटनिदेशक शामकांत डोंगे, सर्व शिल्पनिदेशक व शिल्पनिदेशिका यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे