मुंबई – माण खटाव चे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार मारत राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या ग्रामविकासासारखे महत्त्वाचे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांचेकडे दिले.या आनंदात सहभागी होत माळी विकास मिशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार मंत्रालयासमोरील हॉटेल ट्रायडेंट मुंबई येथे शाल,बुके,अभिनंदन पत्र आणि महात्मा फुले समग्र वाङमय देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माळी विकास मिशन महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चे समन्वयक अमृतराव काळोखे,शिक्षण प्रसार समिती समन्वयक संतोष भोजने, कृषी व उद्योजक आघाडी चे समन्वयक गोविंद सुमन केशव डाके,अर्थ सल्लागार समिती समन्वयक के.आर.चौधरी, किरणजी भुजबळ,पोपटराव राऊत,ज्ञानेश्वर महाजन,सचिन भरणे,अँड.सतीश शिंदे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती