कन्हेरवाडी – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुनिल पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विकास हायस्कूल,कन्हेरवाडी येथे राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त यावर्षीपासून शालेय अंतर्गत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन पुरस्कार देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच शालेय अंतर्गत गणित स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक संजय मिटकरी, मुख्याध्यापक सुनिल पांचाळ,अँड.लालासाहेब कवडे,सरपंच अँड.रामराजे जाधव,अशोक कवडे,वसुदेव सावंत,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बापू भंडारे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गणित संदेश देणारे प्रदर्शन सादर केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पाटील यांनी केले तर आभार संजय कुमार माळी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शालेय समिती,गावातील पालक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश