कळंब – जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक 17 व 18 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांग मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी मैनांक घोष यांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सुनील खमितकर हे होते. या वेळी विक्रांत देशपांडे स्काऊट गाईड धाराशिव,अविनाश देवसठवार प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग लातूर, सच्चिदानंद बांगर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जिल्हा परिषद धाराशिव जाधवर, सहाय्यक लेखा अधिकारी समाज कल्याण विभाग मोहन चव्हाण,कार्यालयीन अधिक्षक,कातंगडे, समाज कल्याण निरीक्षक शेख, समाज कल्याण निरीक्षक, जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेमध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जिल्हा धाराशिव येथील मुलांनी गोल्ड ०९, सिल्वर ०८, कांस्य ११ असे एकूण २८ पदक मिळवत क्रीडा स्पर्धेमध्ये सलग दहा वर्षे चॅम्पियनशिप मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे क्रमांक मिळवले, वयोगट 8 ते 12 मुले- गौरव लांडगे 50 मीटर धावणे द्वितीय,वयोगट 13 ते 16 मुले- विष्णू वायबसे गोळाफेक द्वितीय,शिवम तोंडे गोळाफेक तृतीय.वयोगट 13 ते 16 मुली- कु.वैष्णवी माने 100 मीटर धावणे प्रथम व गोळाफेक प्रथम,अमृता रंधवे गोळा फेक तृतीय,वैष्णवी पेठे 200 मीटर धावणे तृतीय,मनीषा पवार 100 मीटर धावणे द्वितीय व लांबउडी प्रथम, प्राची पेठे 100 मीटर धावणे तृतीय.वयोगट 17 ते 21 मुले- आदेश कांबळे लांब उडीत प्रथम व 200 मीटर धावणे तृतीय,लखन अवधूते गोळाफेक मध्ये प्रथम,सुरज वाघमारे 400 मीटर धावणे प्रथम व गोळा फेक मध्ये तृतीय,गणेश वनवे 400 मीटर धावणे द्वितीय,जयराम अवधूते 400 मीटर धावणे तृतीय,धीरज धोत्रे 200 मीटर धावणे प्रथम व लांब उडीत तृतीय,सुजल पेठे 200 मीटर धावणे द्वितीय. वयोगट 17 ते 21 मुली- तेजस्विनी चवरे 200 मीटर धावणे प्रथम व गोळाफेक द्वितीय,आरती चांदणे 200 मीटर धावणे द्वितीय, स्नेहा घोडके 200 मीटर धावणे तृतीय, स्नेहा कोळी लांबउडी तृतीय, 400 मीटर धावणे प्रथम तसेच सांस्कृतिक स्पर्धेतही मुकबधिर मुलांनी उत्कृष्ट सामूहिक नृत्य सादर करून सहभाग नोंदवला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्या हस्ते बक्षिस व पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सुनंदा दत्तू गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अंकुश योगीराज गव्हाणे यांना देण्यात आला.जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्या हस्ते बक्षिस व पुरस्कार वितरण करण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादरगे यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले