August 9, 2025

स्नेहा वरपे यांचा विविध ठिकाणी सत्कार

  • कळंब – गणेश नगर,डिकसळ ता.कळंब येथील स्नेहा गोरोबा वरपे याची मुंबई येथे पोलीस शिपाई पदी निवड झाल्याने प्रहार क्रांती आंदोलनाचे कळंब तालुका अध्यक्ष गणेशजी शिंदे यांनी संघटनेतर्फे स्नेहा गोरोबा वरपे हिचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  • २) शहरातील ओम मंगल सेवा कळंब येथे स्नेहा हिचे वडील गोरोबा वरपे यांच्या मित्र परिवाराच्यावतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी नरेश कुलकर्णी, शिशिर राजमाने,दर्शन पोरे, संतोष एखंडे,सुनील गायकवाड,अजित बाबळे,संतोष धस या वरपे मित्र परिवाराच्यावतीने स्नेहाचा सत्कार करून तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व तिने जिद्द आणि चिकाटीने मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले.
error: Content is protected !!