August 9, 2025

पोलिस पाटील संघटनेच्या वतीने पत्रकार शिवाजी सावंत यांचा सत्कार

  • कळंब – कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील दै.सकाळ चे पत्रकार राजे सावंत यांना नुकताच अत्यंत मानाचा समजला जाणारा,कळंब तालुका पत्रकार संघाचा,दैनिक सकाळ चे पत्रकार कै.गणेश घोगरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याबद्दल पोलिस पाटील महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ वाघमारे पोलीस पाटील देवधानोरा, खामसवाडीचेचे पोलिस पाटील, विक्रम सुतार,आढाळ्याचे, पोलिस पाटील,प्रदीप वायसे,हळदगावचे पोलिस पाटील,महेश पांचाळ यांनी सत्कार केला.
    यावेळी पत्रकार अशोक कुलकर्णी,सागर कांबळे,युवराज पंडित,शहाजी गवळी,वासुदेव वेदपाठक आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!