March 26, 2026

लढाऊ पॅंथर विजय वाकोडे यांचे निधन

  • परभणी – जेष्ठ नेते,लढाऊ पॅंथर विजय वाकोडे यांचे दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने
    दुःखद निधन झाले आहे. ते एक संवेदनशील मनाचे कार्यकर्ते होते. संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. समाजातील शोषितांची लढाई लढताना त्यांच्यातला पॅंथर कायम जागा असायचा. उपेक्षित, वंचित घटकांचे ते आधारवड होते.आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाची ते हक्काचे ठिकाण होते. त्यांचे पाहाडी आवाजातील वक्तृत्व भल्याभल्यांना घाम फोडणारे होते.पॅंथरचा ढाण्या वाघ म्हणून ते अतिशय लोकप्रिय होते. आपल्या सामाजिक कामाने त्यांनी राज्यस्तरावर आपली वेगळी छाप पडली होती.पॅंथर काळातल्या ध्येयवेड्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे चळवळीतला लढवय्या पॅंथर काळाच्या पडद्याआड गेला आहे.
error: Content is protected !!