शिराढोण – परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या व मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या व निषेधार्थ ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळून दोन्ही प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे शिराढोण पोलिसांकडे केली आहे. गावातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नागरिकांनी एकत्र येऊन यावेळी जोरदार घोषणा दिल्या.यावेळी गावातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला.नागरिकांनी या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध करत शिराढोण पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. या निवेदनात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तसेच संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात अमोल नाईकवाडे अनिल गायसमूद्रे,नीलेश नाईकवाडे,धम्मपाल नाईकवाडे,हनुमंत गाडे,दिपक गाडे,बापू जोगदंड,गावातील युवक,महिला,ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
More Stories
शिराढोण व कळंब तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला पाठबळ
ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी पदनिर्मिती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी
शिराढोण येथे कॅन्सर तपासणी शिबिर;नागरिकांसाठी मोफत सुविधा