कळंब – जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे लोकहित सामाजिक विकास संस्था व श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर ,तहसीलदार हेमंत ढोकले,पोलीस उपाधीक्षक संजय पवार,पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उंडगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पत्रकार बालाजी अडसूळ यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी श्रमिक मानवाधिकार संघाच्या अध्यक्षा सौ.माया शिंदे व सचिव भाई बजरंग भाऊ ताटे उपस्थित होते.यावेळी कळंब व वाशी तालुक्यातील दलितावर होणारे अन्याय दलितांच्या स्मशानभूमीची प्रस्ताव गरोदर महिलांचे प्रश्न ऊसतोड कामगारांचे प्रश्न इत्यादी प्रश्नावर उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्याशी संघटनेचे अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी चर्चा करून निवेदन ही देण्यात आले .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले