September 24, 2026

देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – मनोज जरांगे

  • केज (बाबासाहेब शिंदे) – मस्साजोगचे सरपंच संतोष
    देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ केज व मस्साजोग या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला.जो पर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला होता.या हत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला.या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी या वेळी केली. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना निलंबित करण्यात आले.पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला.खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.या प्रकरणातील मुख्य साक्षीदार यांना संरक्षण देण्यात आले.
    मस्साजोग गावाचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथे अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर मस्साजोग व केज या ठिकाणी आज सकाळ पासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.दुपारच्या सुमारास या रास्ता आंदोलनाला हिंसक वळण लागले.संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले होते.अजून ही रस्ता रोको सुरूच असून जो पर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला असून या हत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग गाव गाठत आंदोलन स्थळी भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी फोनवरून संवाद साधला.संतोष देशमुख यांच्या हत्येने मस्साजोग सह केजच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्व गावच रस्त्यावर असल्याने या दुःखद घटने मुळे कोणाच्याही घरात चूल पेटली नाही.
error: Content is protected !!