August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

  • धाराशिव – विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता तांबरी विभाग येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय (उबाठा) येथे नगरसेवक राणा बनसोडे यांच्या नियोजनात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
    या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजाभाऊ गोवर्धन (महाराज) यांनी परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर सुरु केले.
    याप्रसंगी नगरसेवक राणा बनसोडे,विकी ढेरे,रणवीर चव्हाण,बालाजी झेंडे,गणेश खमितकर,सिद्धार्थ क्षीरसागर,महेश कांबळे,सागर शिंदे,तनिष्क कांबळे,निखिल वाकचौरे,अभय काटे,स्वप्निल चव्हाण,वृषभ भिसे,अभी काटे, सनी कांबळे,करण भिसे,किरण लष्करे,अनिकेत ओव्हाळ, सुबोध बनसोडे,अनिकेत वाघमारे, अक्षय काटे,आर्यन डावरे,
    दिनेश चोले, अविनाश मराळे, इत्यादी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!