धाराशिव ( जिमाका) – जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरु युवा केंद्र यांचे संयुक्तवतीने व राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव यांच्या सहकार्याने ४ ते ५ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी नाटयगृह,धाराशिव येथे करण्यात आलेले आहे.या जिल्हा युवा महोत्सवाचे उद्घाटन दि.४ डिसेंबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांचे हस्ते दिप प्रज्वलन व नटराजाच्या मुर्तीचे पुजन करुन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणुन धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले.यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे,राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी शुभम धुत,अखिल भारतीय नाटय परिषदेचे विशाल शिंगाडे, परिक्षक मिलींद माने,सतीश ओव्हाळ,सुर्यकांत कापसे, श्रीराम नागरगोजे, विनोदकुमार वायचळ,श्रीमती माधुरी कुलकर्णी, दिपक दहिफळे,प्रा.डॉ.उमेश सलगर, सुहास झेंडे,प्रा.डॉ.वैभव आगळे, एस डी.भोसले,एस.टी.गांगुर्डे संजय कोथळीकर,डॉ.दत्तात्रय साखरे,डॉ.होळंबे,डॉ.ननवरे, वाघमारे,समीर माने,पौळ, नागापूरे,चौधरी तसेच विविध शाळा व महाविद्यालयातील युवक व युवती मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती जाधव यांनी जिल्हयाला लोककलेचा वारसा लाभला असुन शहरातील युवक व युवतीनी शालेय शिक्षणाबरोबर विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आजच्या जिल्हा युवा महोत्सवामध्ये सर्व कलाकारांनी उत्कृष्ठ कलेचे प्रदर्शन करुन जिल्हयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना ही संकल्पना दिलेली होती.त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयतील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन प्रकल्प सादर केलेले आहेत.सामुहिक लोकनृत्य,सामुहिक लोकगीत, चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,कथा लेखन,कविता लेखन फोटोग्राफी इत्यादी बाबीमध्ये युवक युवती यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी