कळंब (जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे काही दिवसांपूर्वी अमरण उपोषणाला बसले होते.शासनाला ४० दिवसांची मुदत देण्यात आली होती.मुदत संपुणही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणास खामसवाडी येथे साखळी उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा देत उपोषण कर्ते रमेश साहेबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ ऑक्टोबर रोजी पासून खामसवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या पुर्वी ही रमेश साहेबराव शेळके यांनी आमरण उपोषण केले होते.दोन दिवसांपुर्वी याच मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने कॅन्डल मार्च गावामध्ये काढण्यात आला आहे.या कॅन्डल मार्च मध्ये मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या साखळी उपोषणात रमेश साहेबराव शेळके, बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे, सुनिल वामन शेळके, प्रशांत पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत साखळी उपोषण सुरू राहील असे उपोषण कर्ते रमेश साहेबराव शेळके यांनी या वेळी सांगितले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर