कळंब (महेश फाटक ) – कळंब येथील पत्रकार धनंजय घोगरे यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या हल्लेखोरावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आज कळंब उपविभागीय अधिकारी यांना निवेदानाद्वारे करण्यात आली आहे. तालुक्यातील गोविंदपूर येथील सराईत गावगुंड मिठू मुंडे व त्याच्या साथीदारांनी पत्रकार धनंजय घोगरे यांना मारहाण केली होती. यामध्ये पत्रकार घोगरे यांच्या डोक्यात व शरीराला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. मात्र अद्यापही आरोपींविरुद्ध ठोस अशी कार्यवाही झालेली नाही यामुळे सदरील प्रकरणात आरोपींविरुद्ध कठोर कार्यवाही करावी, आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करावी तसेच पत्रकार घोगरे यांना संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर पत्रकार बालाजी आडसुळ, सतीश टोणगे, उन्मेष पाटील, मंगेश यादव,शितलकुमार धोंगडे,परमेश्वर पालकर, मुस्तान मिर्झा,अमर चोंदे, बालाजी सुरवसे,ओंकार कुलकर्णी,माधवसिंग राजपूत ,रसूल तांबोळी, संदिप कोकाटे,पार्श्वनाथ बाळापूरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले