धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 332 कारवाया करुन 2,24,533 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-महेश किसनराव सुर्यवंशी, वय 38 वर्षे,रा.गौतम नगर उमरगा जि.धाराशिव,ह.मु. 12-11 स्केट- 2 सीबीडी सोलापूर नवी मुंबई यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची हिरो होंडा सिडी डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 43 एएच 9472 ही दि.27.11.2024 रोजी 12.30 ते 13.30 तहसिल कायर्ज्ञलय परिसर उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश सुर्यवंशी यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.” येरमाळा पोलीस ठाणे:मयत नामे-अर्चना उर्फ सोनाली दिलीप जाधव, वय 25 वर्षे यांनी दि.30.11.2024रोजी 11.49 ते 22.00 वा. सु.शिवाजी हनुमंत जाधव यांचे राळे सांगवी शेतातील विहरीमध्ये उडी मारुन पाण्यात बडून आत्महत्या केली. आरोपी नामे- दिलीप सोमनाथ जाधव, रा. राळे सांगवी ता. भुम जि. धाराशिव (पती) यांनी मयत अर्चना हिच्या चारित्र्यावर संशय घेवून मागील एक वर्षा पासून दिलेल्या जाचास व मानसिक त्रासास कंटाळू अर्चना यांनी आत्महत्या केली आहे.अशा मजकुराच्या मयताची आई – फुलाबाई अभिमान पवार, वय 42 वर्षे, रा.अर्जुन नगर पो. फिसरे ता. करमाळा जि. सोलापूर यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 85 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-हबीब बाबुद्दीन इनामदार, अलीम हबीब इनामदार, मालन बी अमीन ईनामदार, राशिदबी हबीब ईनामदार सर्व रा.कानेगाव सर्व रा. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.01.12.2024 रोजी 14.30 वा. सु. कानेगाव शेत शिवारातील शेत गट नं 59/9 मध्ये फिर्यादी नामे-रिहानाबी महमद ईनामदार,वय 50 वर्षे, रा. कानेगाव ता.लोहारा जि. धाराशिव यांना शेतातील बांध कोरण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खोऱ्याचे दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रिहानाबी ईनामदार यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-कुणाल काळे रा. भोसले हायस्कुल समोर धाराशिव ता.जि.धाराशिव यांनी दि.30.11.2024 रोजी 20.30 वा. सु. भोसले हायस्कुलच्या समोरील मुसळे किराणा स्टोअर्स समोरील रोडवर फिर्यादी नामे-किर्तीकुमार बब्रुवान कोळी, वय 33 वर्षे, रा.देशमुख हॉस्पीटलच्या शेजारी तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना रस्त्याने जाण्याचे कारणावरुन रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हातातील कढ्याने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे खिशातील 1,700 ₹ काढून घेवून तु माझेावर केस केलास तर तुला जिवे मारील अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किर्तीकुमार कोळी यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 126(2), 119(1), 118(1), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-नेताजी तुकाराम धुमाळ,अक्षय गोरोबा पाडोळे, सुर्याजी तुकाराम धुमाळ,गोरोबा सौदागर पाडेाळे सर्व रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि.28.11.2024 रोजी 20.00 वा. सु. रुईभर येथे फिर्यादी नामे-अरुण बळीराम भोयटे, वय 55 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांना मोबाईलवर सेस्टस ठेवण्याचे कारणावरून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अरुण भोयटे यांनी दि.01.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अरुण बळीराम भोयटे, पदमराज अरुण भोयटे,पुष्पराज अरुण भोयटे सर्व रा.रुईभर ता. जि.धाराशिव यांनी दि.01.12.2024 रोजी 20.27 वा. सु. रुईभर येथे फिर्यादी नामे-सुर्याजी तुकाराम धुमाळ, वय 31 वर्षे,रा.रुईभर ता.जि. धाराशिव यांना म्हैस अंब्याच्या झाडाजवळ बांधण्याचे कारणावरून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठी व रॉडने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुर्याजी धुमाळा यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.” येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे- राहुल तात्याबा ओव्हाळ, वय 39 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.11.2024 रोजी 22.30 वा.सु. येरमाळा ते बर्शी रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 4206 वरुन जात होते. दरम्यान भारत हॉटेलचे समोर येरमाळा येथे ट्रक क्र एमएच09 बीसी 7776 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा हायगयी व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून राहुल ओव्हाळ यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात राहुल ओव्हाळ हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रक चालक हा अपघाताची माहिती न देता ट्रक जागेवर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुबोधा तात्याबा ओव्हाळ,वय 37 वर्षे,रा.येरमाळा ता.कळंब जि.धाराशिव यांनी दि.01.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(ब),सह कलम 134(अ) (ब), 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी