कळंब- ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आंतरिक गुणवत्ता कक्ष व संगणक विभागातर्फे प्राध्यापक कर्मचाऱ्यांसाठी विकास कार्यक्रम 27/10/2023 रोजी आयोजित करण्यात आला. त्यात “माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापक पद्धती कशी विकसित करावी “याबद्दल डॉ.अमरसिंह वरपे यांनी मार्गदर्शन केले तसेच ई लर्निंग म्हणजे वर्ग अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षण पद्धती होय. शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षण पद्धती आहे असे विचार मांडले.तसेच गुगल फॉर्म.गुगल क्लासरूम,पावर पॉइंट,पीपीटी प्रेझेंटेशन अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार सर यांनी शिक्षक मुलांपर्यंत अनेक माध्यमांद्वारे शिक्षण घेऊन जात आहेत, ही सकारात्मकता अतिशय वाखणण्याजोगी आहे, पण कुठेतरी नाराजीचा सूर आळवला जात आहे, त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल? यावर विचार करावा आणि शिक्षकाने स्वतःला अद्यावत ठेवावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन आणि संचलन आंतरिक गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर आणि आभार सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक डॉ. कमलाकर जाधव यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.संजय कांबळे यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,डॉ.दत्ता साकोळे,डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ.नामानंद साठे,डॉ. भोसले,डॉ.म्हस्के,डॉ. उंदरे, डॉ.महाजन , डॉ.चादर ,प्रा.शाहरुख, प्रा.दळवी,प्रा.सुरज पाटील,प्रा.जमाले ,प्रा. पवार ,प्रा.शिंपले इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रजिस्टर हनुमंत जाधव ,जया पांचाळ यांनी सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले