August 9, 2025

ह.टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त एक तेरा साथ ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

  • धाराशिव ( राजेंद्र बारगुले ) – शहरातील एक तेरा साथ ग्रुप व शासकीय रक्त केंद्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह.टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दि.२० नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
    या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे हे ग्रुप सर्वांसाठी आदर्श व दिशादर्शक ठरत आहे.या ग्रुपचे २१ वे वर्ष असून या शिबिरात ३० रक्तदात्यांनी दान केले असल्याचे संस्थापक शौकत शेख यांनी सांगितले.
    धाराशिव शहरातील वैराग नाका येथील एक तेरा साथ ग्रुपच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहेत.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रुपचे संस्थापक शौकत शेख, दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष अहेमद कुरेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेशराजे निंबाळकर व काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आदी उपस्थित होते.तर रक्त संकलनाचे काम रक्त संकलन धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ.विवेक कोळगे, रक्तपेढी तंत्रज्ञ महादेव सुर्यवंशी, पूजा दळवी,प्रिया खांडेकर, स्टाफ नर्स नामदेव मुंडे,गणेश साळुंके यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास अलीम पठाण,जुबेर शेख,मिलिंद पेठे,बापू गायकवाड, मग बोल टकारी,किरण येडके, पाताळ देवकते,रॉबिन बगाडे, नवनाथ डोंगरे,बाळू बनसोडे, फिरोज पठाण,अरिफ सौदागर, मुजाहिद कुरेशी,अफजल कुरेशी, जहीर कुरेशी,अमजद कुरेशी, महादेव थोरात,रोहित झोंबाडे, माजिद सय्यद यांच्यासह ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!