August 9, 2025

महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी साधला जनतेशी संवाद

  • महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांची महाविकास आघाडीवर टिका
  • कळंब-धाराशिव मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी महायुतीचे कळंब-धाराशिव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांनी कळंब मतदार संघातील गौरगाव,देवळाली,ढोराळा,
    धाराशिव मतदार संघातील खेड,धाराशिव शहरातील मोहिते गल्ली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,पाथ्रुड चौक,कोकाटे गल्ली बँक कॉलनी,अक्सा चौक,काळा मारुती,टी.पी.एस रोड बार्शी रोड येथे नागरिकांशी संवाद साधला.
  • या संवादादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीच्या सध्याच्या आमदारांवर टीका करत त्यांच्या कारभारातील त्रुटींवर प्रकाश टाकला.
    पिंगळे यांनी उपस्थित मतदारांना दिलासा देत सांगितले की, “सध्या मतदारसंघात अनेक समस्या कायम असून,त्या सोडवण्यासाठी सध्याच्या लोकप्रतिनिधींनी ठोस प्रयत्न केलेले नाहीत.मात्र,मला संधी दिल्यास या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील.”
    तसेच अजित पिंगळे यांनी विकासकामांबाबत आपली ठाम भूमिका मांडत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
    संपर्क दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेट देत ग्रामस्थांच्या अडचणी ऐकल्या व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.
  • राज्यात महायुतीने राबविलेल्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील जनता आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला आहे. महायुती सरकारने नेहमीच शेती, पाणी,आरोग्य, शिक्षण, आणि रोजगार या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. व महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी खालील ठळक उपक्रम राबवले त्यापैकीच
    पीकविमा योजना – नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा,
    मुख्यमंत्री सिंचन योजना – शेतीला पाण्याचा मुबलक पुरवठा आणि सिंचन व्यवस्थेचा विस्तार, कर्जमाफी योजना – लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आर्थिक भार कमी केला,ग्रामीण रोजगार योजनेचा विस्तार – गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थलांतर थांबवणे,उत्पन्न वृद्धीसाठी शेतीपूरक उद्योगांचा प्रोत्साहन – दुग्धव्यवसाय,मत्स्यव्यवसाय, आणि फळबाग प्रकल्पांना चालना आदी
    महायुती सरकारने ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवा या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून गावांमध्ये विकासाचा वेग वाढवला आहे.
    ग्रामीण भागाचा विकास हेच आमचे ध्येय आहे आणि येत्या काळातही महायुती सरकार ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहील,असे महायुतीने जाहीर केले आहे.
    याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी खोचरे,जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंखे,विधासभा पक्ष निरीक्षक वर्षा मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुशील शेळके,खामसवाडी सरपंच अमोल पाटीलसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
error: Content is protected !!